आमची माहिती

संस्कृती | परंपरा | कला

‘रुद्रतेज वाद्य पथक’ची स्थापना २०११ साली संस्थापक श्री. अमित गायकवाड यांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणून पारंपरिक ढोल-ताशाच्या माध्यमातून बाप्पा विषयीची भक्ती व्यक्त करण्याच्या उद्देशाने केली. ‘रुद्रतेज’ हे नावच त्या प्रचंड ऊर्जा, भक्तिभाव आणि निनादाचं प्रतीक आहे, जे पुण्याच्या मिरवणुकांमध्ये दरवर्षी घुमत असते. सुरुवातीला केवळ २ ढोल, १ ताशा आणि १ ध्वजासह सुरू झालेलं हे पथक आज १००+ ढोल, ३५+ ताशा, २५+ ध्वज आणि वयाच्या १० ते ५५ वयोगटातील २०००+ सदस्य असलेलं एक संघटित वाद्यपरिवार बनलं आहे. रुद्रतेजचं प्रत्येक वादन म्हणजे केवळ ताल नव्हे तर त्यामागे शिस्त, भक्ती आणि परंपरेचं जतन आहे. गणेशोत्सव, धार्मिक मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पथकाची सशक्त उपस्थिती असते. ही संस्था केवळ ढोल-ताशा वाजवणारी नाही, तर सामाजिक एकोपा, संस्कृतीचा अभिमान, आणि तरुणांमध्ये शिस्त व भक्तिभाव निर्माण करणारी एक प्रेरणादायी चळवळ आहे.

वाद्य

0 +

सदस्य

0 +

वादन

0 +

कौतुकास्पद

सामाजिक बंधिलकी

आमचे प्रतिष्ठान सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यासोबत सामाजिक जबाबदारीही जोपासते. रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, रेशन किट वाटप आणि विहीर बांधणी अशा उपक्रमांद्वारे आम्ही समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामागे एकच ध्येय असते – “समाजासाठी काहीतरी परत देणे”. या कार्यातून आम्ही लोकांमध्ये एकोपा, जागरूकता आणि सेवा भावना रुजवतो, ज्यामुळे समाज अधिक सक्षम आणि प्रेरणादायी बनतो.

संपर्क

वादना संबंधित:

९६३७३ १९०८२

पत्ता:

कार्यालयीन पत्ता:

शिवमंदिर,काळेपडळ, हडपसर, पुणे

सरावाचा पत्ता:

बंटर स्कूल, गाडीतळ, हडपसर

सोशल मीडिया

© 2011 Rudratej Dhol Tasha Pathak. All rights reserved.

Scroll to Top