रुद्रतेज वाद्यपथक, हडपसर पुणे येथील पहिले वाद्यपथक असून याची स्थापना २०११ साली झाली. स्थापना दिवसापासून आम्ही पारंपरिक ढोल-ताशा वादनाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपत विविध गणेशोत्सव, मिरवणुका आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये उत्साहवर्धक वादन सादर करत आहोत. फक्त सांस्कृतिक कार्यापुरतेच मर्यादित न राहता, रुद्रतेज वाद्यपथक सामाजिक बांधिलकीतूनही सक्रिय कार्य करत आहे. यामध्ये स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे तसेच कोरोना काळात गरजूंना रेशन किटचे वाटप अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. शिस्त, परंपरा आणि सेवाभाव यांचा समन्वय साधत समाजात सकारात्मक बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे.